शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बुरुजांच्या डागडुजीचा प्रयत्न : भाजपशी छुप्या संगतीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:28 IST

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांनी सांगली

ठळक मुद्देराष्ट्रवादीची ‘हल्लाबोल’मधून पालिका निवडणुकीची तयारी

शीतल पाटील।सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांनी सांगली महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. कधीकाळीचा छुपा मित्रपक्ष असलेल्या भाजपवर सर्वच नेत्यांनी तोंडसुखही घेतले. पण स्वपक्षातील गटबाजीवर मात्र सावध पवित्रा घेत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महापालिका क्षेत्रात पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीची मोठी हवा होती. पण भाजपशी छुप्या संगतीने त्यांचे एकेक बुरूज ढासळले. आता निवडणुकीच्या तोंडावर या बुरुजांची डागडुजी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यात यश आले की नाही, हे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.हल्लाबोल यात्रेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळातील नेते आमदार जयंत पाटील यांनी भाजपवर हल्ला चढविला. सांगलीच्या स्टेशन चौकातील सभेत तर केंद्र, राज्यातील भाजप सरकारबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत भाजपवर टीका करण्यात आली. सर्वच नेत्यांच्या केंद्रस्थानी भाजप होता. पण ही वेळ राष्ट्रवादीवर का आली, याचे आत्मचिंतनही नेत्यांनी करायला हवे. वसंतदादा, राजारामबापूंच्या जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजविण्यात राष्ट्रवादीचाच मोठा हातभार आहे. विशेषत: सांगली महापालिका क्षेत्रातील दोन विधानसभा मतदारसंघ तर भाजप-राष्ट्रवादी हे दोघेही मित्रपक्षच बनले होते. त्यांची युती उघड नसली तरी छुपी होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सांगली-मिरज या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजप उमेदवाराच्या प्रचारात होते. अगदी पक्षाचा उमेदवार असतानाही त्यांच्या प्रभागातील मतदानाची आकडेवारी पाहिल्यास, प्रत्येक ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर होता. यामागे काँग्रेसचे हेवीवेट नेते मदन पाटील यांचा पराभव करणे, हाच एकमेव हेतू दिसून आला. त्यासाठी सुरेश पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बळीचा बकरा बनविण्यात आले. अगदी अजित पवार यांनीच सुरेश पाटील यांची उमेदवारी दिली असतानाही स्थानिक नेत्यांनी राजकीय खेळी करून भाजपच्या विजयात हातभार लावला.

त्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपशी सलगी वाढली. अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला, तर विद्यमान नगरसेवकांचे भाजपप्रेम दिवसेंदिवस वाढत चालले. त्यातून आता १८ नगरसेवक व ३३ पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसे घडल्यास पुन्हा एकदा महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी क्षीण बनणार आहे. हा धोका ओळखूनच आता जयंत पाटील यांच्यापासून सारेच नेते भाजपवर टीका करू लागले आहे.

भाजपप्रेमाच्या भरतीमुळे राष्ट्रवादीचे बुरुज ढासळत गेले. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने या बुरुजांची डागडुजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा वादही पेटला आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यात समेट कसा घडणार, यावरच राष्ट्रवादीचे मरगळलेले कार्यकर्ते रिचार्ज होणार की नाही, हे ठरणार आहे.काँग्रेसशी आघाडी, की स्वबळावर?महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडे नेतृत्वाची वानवा आहे. पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी आहे. त्यात राष्ट्रवादीची पडझड होत आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसला एकमेकाशी मिळतीजुळती भूमिका घ्यावी लागणार आहे. दोन्ही पक्षात आघाडी झाल्यास त्याचे नेतृत्व आपसुकच आमदार जयंत पाटील यांच्याकडेच येईल. पण हा निर्णय दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करावा लागेल. अन्यथा ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करावी लागण्याची शक्यताही आहे.पोस्टरवरून गटबाजीराष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेवेळी स्टेशन चौकातील पोस्टरवरून कमलाकर पाटील यांना वगळले होते. इतर तालुक्याच्या ठिकाणी झालेल्या सभेत मात्र तेथील नेत्यांची छायाचित्रे होती. यावरून कमलाकर पाटील गट नाराज झाला असून त्याचे खापर संजय बजाज यांच्यावर फोडले जात आहेपक्षातील अनेकजण : कुंपणावरमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक भाजपच्या कुंपणावर आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजताच ते भाजपमध्ये उडी मारणार असल्याची चर्चा आहे. काहींनी तर भाजपशी गुप्त चर्चा करून आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबही केले आहे, तर काहीजण अद्याप चर्चेच्या फेऱ्यात आहेत. बुधवारच्या हल्लाबोल यात्रेच्या स्टेशन चौकातील सभेवेळी हे कुंपणावरील नगरसेवकही उपस्थित होते. अगदी व्यासपीठावर बसले होते. पण त्यांच्याबद्दल खुद्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच संशय आहे. अशा कुंपणावरील नगरसेवकांचे काय करणार, त्यांचा ऐनवेळी भाजपप्रवेश झाल्यास त्यांना पर्याय काय असणार, याचाही विचार पक्षाला करावा लागेल.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण